गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचे निधन

शिरोळ : कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव बाबुराव पाटील (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले होते, अहवाल देखील निगेटीव्ह आला होता. पुन्हा तब्बेत खालावून निमोनिया झाला होता. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. सतरा वर्षे गोकुळ दूध संघाचे संचालक तर दोन वर्ष अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.शिरोळचे सरपंच पदही त्यांनी भूषविले होते.माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.आमदार भास्करराव जाधव यांचे ते इवाई होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नांतवंडे असा परिवार आहे.