बालिंगेतील स्मशानभूमी जिल्ह्यासाठी रोल मॉडेल

कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीने सहा लाख रुपये खर्चून स्मशानभूमीचे सुशोभिकरण केले आहे.  हायमास्क,  प्रेत कट्टा, केस कापण्यासाठी  स्वतंत्र कट्टा,  पेव्हींग ब्लॉक,  गटर्स, पाण्याची व्यवस्था. अशी  अत्याधूनिक स्मशानभूमी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रोल मॉडेल ठरेल. 

गावातील नागरिकांच्या मुलभूत सोयी-सुविधा देण्याचे काम ग्रामपंचायत करते. ही जशी जबाबदारी असते तसेच आयुष्याच्या शेवटचा विसावा ज्या ठिकाणी होतो,  स्मशानभूमीतही सुविधा देणे गरजेचे असते. मात्र आजही अनेक गावात स्मशानभूमी नाहीत. ज्या आहेत त्याचे पत्रेही गायब झालेले दिसतात.

एकीकडे असे असताना दुसऱ्या  बाजूला  बालिंगे  ग्रामपंचायतीने स्मशानभूमीचे रोल मॉडेल उभे केले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या २५/१५ निधीतून ६ लाख रुपये खर्च करुन सुसज्ज अशी स्मशानभूमी  तयार  केली  आहे. स्मशानभूमीचे उदघाटन सरपंच  मयूर मधूकर  जांभळे  यांच्या हस्ते करण्यात आले.  

सरपंच जांभळे म्हणाले,  गेल्या  वर्षभरात शासनाकडून  निधी  आणतअसताना त्याचा विनियोग  चांगल्या पध्दतीने झाला  तर त्यातून कोणतेही गाव मॉडेल होण्यास वेळ लागत नाही.  बालिंगेसाठी आलेला  शासनाच्या प्रत्येक रुपया चांगल्या  कामासाठी खर्च करण्याचा कसोशीने प्रयत्न आहे. 

कृष्णात जांभळेंचे ‘दातृत्व’स्मशानभूमीसाठी पाणी व वीजेचे व्यवस्था कृष्णात जांभळे यांनी कायम स्वरुपी मोफत दिली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार अनिल पोवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे, ग्रामसेवक राजेंद्र भगत,  माजी सरपंच अनिल पोवार, श्रीकांत भवड,  जनार्दन जांभळे,  वसंतराव जांभळे,  मोहन कांबळे, नंदकुमार जांभळे,  धनंजय ढेंगे, बाजीराव माने,  विश्वासजांभळे,  प्रकाश जांभळे,  पांडूरंग वाडकर, अजय भवड, कृष्णात माळी, रघूनाथ कांबळे,  संदीप सुतार,  संतोष जाधव आदी उपस्थित होते.