मौजे म्हारूळ येथे गोचीड निर्मूलन व औषध फवारणी….

बहिरेश्वर: म्हारुळ तालुका करवीर येथील दूध कामगार युनियन व विरर्बॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

गावातील सर्व प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेने गावातील संपूर्ण जनावरांना एकाच वेळी एकाच दिवशी गोचीड ,तांबू, पिसू या वरील औषध फवारणी करून गावांमध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.

विरबॅक अॅनिमल हेल्थ इंडिया प्रा.लि घ्या या नाविन्यपूर्ण उपक्रम मुळे गोचीड ,तांबु पिसू यापासून दुग्धजन्य जनावरांना होणारा त्रास कमी व्हावा तसेच दुध उत्पादक सभासद निरोगी रहावा या साठी हा उपक्रम राबविला जात आहे असे सचिव सरदार पाटील यांनी सांगितले .याप्रसंगी रोहित येवले ,डॉक्टर दीपक कांबळे सर्व संस्थांचे कर्मचारी, सरदार पाटील, रंगराव पाटील, अभिजीत चौगुले, संग्राम चौगुले, उत्तम जाधव, सरदार पाटील, संदीप पाटील, शिवाजी कुंभार, गणेश कुंभार, दिलीप चव्हाण, उमाजी चौगुले तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.