कोल्हापूर ते मिरज ये – जा करणाऱ्या रेल्वे गाड्या वळीवडे स्टेशन वर थांबवण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूरला जाणाऱ्या व कोल्हापूरहून मिरजेस जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या वळीवडे स्टेशन ( गांधीनगर ) येथे थांबवाव्यात अशी मागणी करवीर शिवसेना व गांधीनगर होलसेल व रिटेल व्यापारी असोसिएशन कडून केली जात आहे.

गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ असल्याने तेथे बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. तसेच मिरज, सांगली, हातकणंगले, रूकडी ,जयसिंगपूर हून येथे कामगार येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही हजारात असल्याने त्यांना मासिक पास काढला की रोज ये-जा करणे सुलभ होते.

तसेच खरेदीला येणाऱ्या ग्राहकांनाही रेल्वे सर्वात सोयीस्कर पडते गांधीनगर मधून ही मोठ्या प्रमाणात ये-जा करण्याची संख्या मोठी आहे. कर्मचारी वर्गाला इतर वाहनाने ये-जा परवडत नाही तो खर्च रेल्वे खर्चाच्या पाच पट होतो. ते आधीच कोरनाने त्रस्त झाल्याने संसाराचा गाडा चालवणे मुश्कील झाले आहे. तसेच सकाळी ८:२० वाजता मिरज हून येणारी रेल्वे ही फक्त रेल्वे कर्मचारी त्यामध्ये बसू शकतो व सायंकाळी ५:०० वाजता ती गाडी कोल्हापूर हून मिरजकडे रवाना होते.त्यामध्ये रेल्वे कर्मचारी सोडून अन्य प्रवाशांना प्रवास करता येत नाही. त्यामध्ये ही इतर सर्व प्रवाशांना प्रवास करता यावा याबाबत निर्णय घेण्यात यावा तसेच महालक्ष्मी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस कोयना गाडीसह कोणत्याही गाड्यां बंद नकरता सर्व पॅसेंजर कोल्हापूरला येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्यांचा थांबा ही गांधीनगर स्टेशनवर व्हावा. तसेच गांधीनगर होलसेल व्यापारी व रिटेल व्यापारी यांच्या रेल रोको आंदोलनास करवीर शिवसेना पाठीशी असणार व कष्टकरी कामगारवर्ग व ग्राहकांच्या दृष्टीने त्वरित निर्णय व्हावा ही विनंती.या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना व गांधीनगर होलसेल व रिटेल व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने मा. विजय कुमार स्थानक प्रबंधक,मॅनेजर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर यांना देण्यात आले.या मागणीची दखल त्वरित घ्यावी अन्यथा रेल रोको करण्याचा इशारा शिवसेना व गांधीनगर व्यापारी असोसिएशनने दिला.

यावेळी अधिकाऱ्यांनी गांधीनगर मधील रेल्वेच्या समस्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून लवकरात लवकर समस्या सोडवू असे आश्वासन दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,मा. उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, विभागप्रमुख बाबुराव पाटील,शाखाप्रमुख दिपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनिल पारपाणी, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे,विजय पारपानी तसेच रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा, होलसेल व्यापारी अध्यक्ष सुरेश आहुजा, सिंधी कॉन्सल ऑफ इंडिया ज.सेक्रेटरी विनोद आहुजा, सुनील बदलानी,सुनील चावला, नंदलाल रंगलानी, सुनील जयसिंगानी,अमर सादवानी,महेश सचदेव, राजेश सुंदरानी, बलराम तनवाणी, अनिल अमरापूरकर,किशोर कामरा, शकील किल्लेदार, तमन्ना कळकुटळे आदी उपस्थित होते.