पंढरपूर : भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात आकर्षक तिरंगी स्वरुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे.
सजावटीकरीता झेंडू, शेवंती, कामिनी व पानांची रंगसंगती वापरून सजावट केली आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, विक्रम भुरुक, राहुल पोकळे, संतोष पोकळे, भोलेश्वर पोकळे यांनी सजावटीसाठी 750 किलो फुले मंदिरास दिली असून पंढरपूर येथील साई डेकोरेटर्स यांनी सजावट केली आहे.