गगन बावडा तालुक्यातील अणदूर येथिल भरावाचे काम थांबले नाही तर आत्मदहनाचा इशारा

गगनबावडा प्रतिनिधी – दिगंबर म्हाळुंगेकर

गगनबावडा: गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथे चालू असलेल्या धरणाच्या भरावाचे काम 4-5 दिवस झाले चालू आहे व त्या ठिकाणी पुलाच्या उत्तरेकडील बाजूस भराव न घेता त्या ठिकाणी पिलर होऊन पूल व्हावेत ते झाले तर शेणवडे, खोकूर्ले, पडवळवाडी, असलज, पळसंबे या परिसरात होणारे अल्पभूधारक शेतकरी व घराचे होणारे नुकसान टळेल जर असे नाही झाले तर आम्ही शेतकरी व पूरग्रस्त येत्या 8 दिवसात जनआंदोलन उभा करून जलसंमाधी घेऊ.

ह्या गंभीर समसेकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा असे तसीलदार ऑफिस ला निवेदन देण्यात आलेयावेळी उपस्थित गगन बावडा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,भिवाजी वरेकर, कृष्णात चिले, विवेक सणगर व इतर कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.