उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांबरोबर चर्चा करणार : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्या विकास निधीतून पूर्ण झालेल्या एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव, संभाजी जाधव प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून कोटयावधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली. या सर्व कामाचे उद्घाटन आज होत आहे.

चंद्रकांत जाधव यांच्यावर कोल्हापूरकरांनी प्रेम केले, साथ दिली. तशीच साथ कोल्हापूरकर जयश्रीताईना देतील असा विश्वास आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता जेथे जेथे पोटनिवडणूका झाल्या, तेथे तेथे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलो आहे. कोल्हापूर उत्तरची जागा कॉग्रेसची आहे. राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीचेच घटक पक्ष आहेत. त्यामुळे पोटनिवडणूकीत त्यांनी आमच्या सोबतच यावे, अशी अपेक्षा असणार आहेत. तसेच कोल्हापूरच्या विकासाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्रीताईना बिनविरोध संधी द्यावी, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची वैयक्तिक भेट घेणार आहे व कोल्हापूरच्या पोटनिवडणूकीत बिनशर्त पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार आहे.

कोल्हापूरला पुरोगामी विचाराचा वारसा असून, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वेगळी विचाराची राजकीय संस्कृती आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांनी साथ दिली तर निश्चितपणे जयश्रीताई सर्वांना विश्वासात घेऊन पुढच्या काळामध्ये काम करतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

प्रभाग क्र. 45, कैलासगडची स्वारी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्र. 33, महालक्ष्मी मंदिर प्रभागातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्र. 55 मधील पद्माराजे उद्यान अंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसविणे,
प्रभाग क्र. 54, चंद्रेश्वर येथे रस्ता डांबरीकरण, प्रभाग क्र. 48, तटाकडील तालीम येथे रस्ता डांबरीकरण आणि प्रभाग क्र. 32, बिंदु चौक, भेंडे गल्लीत रस्ता कॉक्रीटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ पालक मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला.
कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, महिला कॉग्रेस शहराध्यक्ष सध्या घोटणे, गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते, ईश्वर परमार, जितू सलगर, अजित पवार, संदीप सरनाईक, संतोष महाडिक, अनिल कोळेकर, उमेश पोवार, आर. डी. पाटील, बाबा पार्टे, इंद्रजित बोंद्रे, करण शिंदे, राजू जाधव, अशोक भंडारी, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, भरत रसाळ, आदिल फरास, श्रीकांत माने, अजित राऊत, विक्रम जरग, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, रमेश पुरेकर, संजय शेटे, उदय दुधाने, दीपक चोरगे, अनिल घाटगे, अजय इंगवले, अनिल कदम, प्रकाश पाटील, संपत चव्हाण, दीपक थोरात, सुजय पोतदार, चंद्रकांत चिले, अजित अजरी, शक्ती आठवले, नेपोलियन सोनुले, उदय फाळके, श्रीकांत बनछोडे, अनिल पाटील, प्रसाद जाधव, प्रशांत गणेशाचार्य, चंदा बेलेकर, उज्वला चौगुले, पद्मिनी माने, यांच्यासह माजी नगरसेवक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.