‘विश्वास’चे गांडूळखत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी अत्यंत दर्जेदार….मानसिंगराव नाईक

शिराळा : ‘विश्वास’चे गांडूळखत अत्यंत दर्जेदार असून त्याच्या वापराने जमिनीचा पोत सुधारून पिक वाढीस चालना मिळेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला. ते चिखली येथे लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विश्वासराव नाईक कारखान्यात तयार केलेल्या गांडूळ खत निर्मिती व विक्रीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, संचालक विराज नाईक प्रमुख उपस्थित होते.आमदार नाईक म्हणाले, सेंद्रीय खत उत्पादन प्रकल्पामार्फत उच्च प्रतिच्या गांडुळखताची निर्मीती केली जात आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र हे ज्यादा पर्जन्यमानाचे असल्यामुळे सेंद्रीय कर्बाचे प्रमाण अतिशय कमी आढळते. यामुळे ऊस उत्पादनामध्ये अपेक्षित वाढ होत नसल्याचे दिसुन येत आहे. हाच उददेश डोळ्यासमोर ठेवून संचालक मंडळाच्या संकल्पनेतुन भागातील शेतकऱ्यांना अल्पदरामध्ये सेंद्रीय खताची उपलब्धता होण्याचे दृष्टीने कारखाना साईटवरती गांडुळ खत निर्मीती प्रकल्प सुरु केला आहे. त्याचा विक्री शुभारंभ आज संपन्न झाला.प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गांडूळ खंत विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, विष्णू पाटील, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, बिरुदेव आमरे, डॉ. राजाराम पाटील, हंबीरराव पाटील, बाबासो पाटील, यशवंत निकम, सुरेश पाटील, सुहास पाटील, तुकराम पाटील, यशवंत दळवी, बाळासाहेब पाटील, बिरुदेव आंबरे, आनंदा पाटील, सुकुमार पाटील, दत्तात्रय पाटील, दिपक तडाखे, अजितकुमार पाटील तसेच विश्वास पाटील व कोडिंबा चौगुले व इतर मान्यवर, खातेप्रमुख उपस्थित होते. शेती अधिकारी विठ्ठल चव्हण यांनी आभार मानले.