शरद पवारांना कोरोनाची लागण….. स्वत: ट्विट करुन दिली माहिती

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी, ओमायक्रॉनचा धोका असल्याने खरबदारी म्हणून कोरोना नियमावली व निर्बंध आणखी कडक करण्यात आले. तिसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली, पण बेडची गरज किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही. त्यामुळे, विलिगीकरणात राहूनचा कोरोनावर नेतेमंडळींनीही मात केली आहे. आता, शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली.  माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, काळजी करण्याचं कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.