शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन. डी.पाटील यांचे निधन..

कोल्हापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचं निधनं झाले आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे.

प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना मे 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी खमकेपणाने साथ दिली.