शिवाजी चौक नाही…छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं…..

औरंगाबाद –  राज्यातील अनेक चौकांना छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. मात्र अनेक जण यास शिवाजी चौक असेच म्हणतात. दरम्यान गंगापूर नगरपालिकेने शिवाजी चौक नाही…छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं असे ठणकावून सांगितले आहे.

गंगापूर शहरात विविध चौकांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक या नावांचा समावेश आहे. मात्र या चौकांचा एकेरी उल्लेख केला जातो हे टाळण्यासाठी गंगापूर नगरपालिकेने शहरभर होर्डिंग्जस लावले आहे.गंगापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. मात्र या चौकास शिवाजी चौक असाच सर्वत्र उल्लेख होताना दिसून येत आहे. यासाठी गंगापूर नगरपालिकेने नुसतं शिवाजी चौक म्हणायचं नाही; तर छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणायचं. या आशयाचे होर्डिंग्जस लावले आहे. गंगापूर शहरात लावलेल्या या होर्डिंग्जची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. यापुढे महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेने होर्डिंग्जस लावून नागरिकांना आवाहन केले आहे.दरम्यान, गंगापूर नगरपालिकेने गंगापूर शहरातील सर्व चौकात, रस्त्यांवर वेगवेगळ्या महापुरुषांचा सन्मान आदर राखण्यासाठी आणि त्यांची प्रेरणा मिळावी यासाठी होर्डिंग लावले आहेत. त्यात लासूर नाका नाही तर हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असेच म्हणायचे, असे बॅनर लावले आहेत.