पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

मुंबई: कोरोना महामारीमुळे महागाईचा भडका उडालेला पहायला मिळत आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.आज इंधन दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

किंमती आणि मागील काही काळ पाहता गेल्या 73 दिवसांत पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही.आज दिल्लीत पेट्रोल 5.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज 109.98 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे.दरम्यान, इंधन दरवाढ अशीच सुरु राहिली तर पेट्रोल लवकरच 120 लीटरचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. वाढता पेट्रोल आणि डिझेलचा दर पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झालं आहे.