ऐन हंगामात सांगली जिल्ह्यात द्राक्ष काढणीला ‘ब्रेक’

सांगली : शेतकऱ्यांसाठी यंदाच्या वर्षात सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. मग ते अवकाळी पाऊस असो की दरवर्षी फायद्याची ठरणारी थंडी असो.थंडीमुळे पिकाची वाढ होते, फळ बागांना मोहर लागतो पण अधिकच्या गारठ्यामुळे सांगली जिल्ह्यात थेट द्राक्ष काढणीलाच ब्रेक बसला आहे.

द्राक्ष बागाह्या गेल्या तीन महिन्यांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहेत, मात्र, वर्षभर केलेला खर्च आणि आता पीक पदरात पडतानाच माघार कशी घ्यायची म्हणून शेतकऱ्यांनी खर्चाचा विचार न करता बागा जोपासण्यावर भर दिला पण आता हंगाम सुरु झाला तरी संकटाची मालिका ही सुरुच आहे. वाढलेल्या गारट्यामुळे द्राक्ष काढणी करताना मण्यांना तडा जात आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून द्राक्ष काढणी रखडलेली आहे.