मौजे बहिरेश्वर येथे आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ

बहिरेश्वर प्रतिनिधी: बहिरेश्वर तालुका करवीर येथे आमदार पी एन पाटील ,जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या फंडातून केलेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ कुंभी कासारी कारखान्याचे माजी संचालक सिताराम पांडुरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.

यावेळी घंटागाडी ,पथदिवे, वॉटर एटीएम मशीन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार पी एन पाटील म्हणाले करवीर तालुक्यात पहिल्यांदाच घंटागाडी चे उद्घाटन करण्याचा योग बहिरेश्वर गावामध्ये आला. तसेच शहरी भागात सारखे वॉटर एटीएम मशीन ग्रामीण भागात आल्यामुळे पाच रुपयाला वीस लिटर स्वच्छ पाणी ही संकल्पना नाविन्यपूर्ण योजना आहे. याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा.

जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघात केलेला विकास निश्चितच गौरवास्पद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.तसेच कुंभी कासारी चे कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ नेते सीताराम पांडुरंग पाटील पंच्याहत्तरी आमदार पी एन पाटील पुष्पगुच्छ देत त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी बहिरेश्वर गावातील पहिली महिला पोलीस काजल काशीद , तसेच पुणे येथे पीएचडी प्राप्त करणारे रविंद्र परशुराम बचाटे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते महिला मंडळ यांना जाजम,डस्टबीन प्रदान करण्यात आले, शिवाय जिल्हा परिषद सदस्य यांचे फंडातून करवीर पश्चिम भागातील प्राथमिक शाळांना प्रयोग साहित्य व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले .

ग्रामपंचायत बहिरेश्वर यांच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कुंभी कासारी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शामराव बाबुराव गोधडे यांनी आमदार पी एन पाटील यांना कोगे बहिरेश्वर बंधारा त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी केली..बंधा-याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊ अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली .. माजी सरपंच सूर्यकांत दिंडे यांनी श्रीकृष्ण तलाव ,बहिरेश्वर ते बीड रस्ता कामांचे प्रस्ताव आमदार पी एन पाटील यांचेसमोर मांडले, यावेळी आमदार पाटील यांनी गावात केलेल्या विकास कामाचा आढावा देत केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही दिली ..यावेळी गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे करवीर पंचायत समिती चे उपसभापती अविनाश पाटील, करवीर चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच युवराज दिंडे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य तानाजी गोदडे यांनी केले तर आभार कोटेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन रघुनाथ बाबुराव वरुटे यांनी मानले.