शिराळा तालुक्यातील भागाईवाडी येथे शेती भागातील डोंगरांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग..

भागाईवाडी : शिराळा तालुक्यातील भागाईवाडी येथे शेती भागातील डोंगरामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 30 एकरातील गवत जळाले. त्या जळीतग्रस्त भागाची व नुकसानीची पहाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.

यावेळी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कारंडे, उप अभियंता प्रल्हाद बुचडे व चिखलीचे सहाय्यक अभियंता विशाल खामकर, मारुती पाटील, उपसरपंच राम पाटील, सोसायटीचे अध्यक्ष भीमराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, अर्जुन पाटील, निवास पाटील, जयसिंग पाटील, रायाजी कांबळे, सागर ढोकळे, विक्रम लुगडे, आनंदा पाटील, प्रकाश पाटील, सर्जेराव पाटील, बाबासो पाटील, आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.