कोल्हापूरच्या तीन मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही भाजपचा इशारा..!

कोल्हापुर: कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल जनतेसाठी महत्त्वाचे असताना येथील रुग्णांना योग्य प्रकारची सुविधा व उपचार मिळत नाही त्यातच येथील अनेक डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर सिंधुदुर्ग मध्ये पाठवण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.

हा निर्णय रद्द करावा अन्यथा भाजपातर्फे आंदोलन छेडले जाईल आणि जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला. आज त्यांनी सीपीआरमध्ये हे आंदोलन केले.