उचगाव: उचगाव व प्रत्येक गावामध्ये सध्या ऑनलाईन उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले असून सध्या पूर्वी हस्तलिखित चे उतारे मधील नावे बरोबर असून सध्या ऑनलाईन उतारे देण्याचे काम चालू आहे, तरी ऑनलाईन मधील नावात बदल झाला असून नागरिकांना उतारे नावात बदलांसह मिळत आहेत.
त्यामुळे नागरिकांना खरेदी विक्री करिता किंवा बँक लोन साठी अडचणीचे ठरत आहे. तरी हस्तलिखित उतारे प्रमाणे ऑनलाईन उताऱ्यातील चुकीचे बदल हे तात्काळ दुरुस्त करण्यासाठी गावागावात कॅम्प घेऊन ते तात्काळ नागरिकांना दुरुस्त करून मिळावेत, जेणे करून नागरिकांना खरेदी विक्री व बँक लोन काढण्याकामी उपयोगी येतील, आपणाकडून अशा दुरुस्ती बाबत*संबंधित तलाठी यांना सूचना होऊन प्रत्येक गावातील नागरिकांना याबाबत अर्ज करण्यासाठी नोटीस बोर्डावर नोटीस लावून ते तात्काळ दुरुस्त करून मिळावेत हि करवीर शिवसेनेची मागणी आहे. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने मा.विपीन लोकरे,नायब तहसीलदारसो, करवीर यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यालयातील ज्या चूका आहेत त्या ऑफलाईन उताऱ्याप्रमाणे ऑनलाइन वर दुरुस्त करून देऊ असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर,युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले,अरविंद शिंदे, विशाल हांगीरकर,हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.