कोल्हापूर: राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्य सरकारचा निर्णय….उद्या रविवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे.
खेळाची मैदान, उद्यान, पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद राहतील….उद्या मध्य रात्रीपासून नाईट कर्फ्यु,रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत घराबाहेर पडण्यासाठी बंदी राहणार आहे.
नाट्यगृहे, चित्रपटगृहे रात्री दहापर्यंतचं सुरू ठेवता येणार, 50% क्षमतेने…शाळा-कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार… जिम, स्विमिंग पूल आणि स्पा सेंटर पूर्ण पणे बंद राहणार….सलून आणि खाजगी कार्यालय 50% क्षमतेने सुरू ठेवता येतील…खाजगी ऑफिस मध्ये दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कामासाठी परवानगी…अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी…तर सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न कार्यक्रमासाठी केवळ 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी….राज्यांतर्गत आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी देखील नवी नियमावली लागू होण्याची शक्यता…कोल्हापूर जिल्हाधिकारी जिल्ह्यासाठी या नियमावलीचे आदेश उद्या रविवारीकाढण्याची शक्यता…..