भोगावती नदी पात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी

बहिरेश्वर प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील आरे,बीड,बहिरेश्वर दरम्यान वाहणाऱ्या भोगावती नदी पात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले.

सकाळपासूनच नदीकाठावर मासे पकडण्यासाठी खवय्यांची भाऊ गर्दी होती. या दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .तरी ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने केल्या आहे. शिवाय पाणी दूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.