कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक अपडेट २०२२…

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक मतमोजणीला सुरुवात सकाळी सातपासून रमणमळा भागातील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली आहे. चाळीस टेबलवर मतमोजणी होत आहे प्रथम पहिल्या गटातील मतमोजणीला सुरुवात झालीय.. समोर आलेल्या माहितीनुसार भुदरगड मधून रणजीत पाटील विजयी तर यशवंत केरबा नांदेकर पराभूत, शिरोळ मधून राजेंद्र पाटील विजयी तर गणपतराव पाटील पराभूत, शाहुवाडी मधून रणवीर सिंह गायकवाड विजयी तर सर्जेराव पाटील पराभूत, आजरा मधून सुधीर देसाई विजय तर अशोक चारटी पराभूत, त्याचबरोबर प्रक्रिया गटातून खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील विजयी झालेत तर तर सत्ताधारी गटाला धक्का बसलाय प्रक्रिया गटातून प्राध्यापक अर्जुन आबिटकर विजयी तर आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव झाला आहे.