कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक अपडेट..

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक मतमोजणीला सुरुवात सकाळी सातपासून रमणमळा भागातील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली आहे. चाळीस टेबलवर मतमोजणी होत आहे प्रथम पहिल्या गटातील मतमोजणीला सुरुवात झालीय..आताचा हाती आलेल्या माहितीनुसार आजरा गटातून राष्ट्रवादी सुधीर देसाई, शाहूवाडी गटातून रणवीर, गडिंग्लज गटातून संतोष पाटील विजयी झालेत तर पन्हाळा गटातून आ. विनय कोरे , शाहूवाडी विकास संस्था गटातून रणवीर मानसिंगराव गायकवाड , विजयी झाले असून खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटिल विजयी तर शिरोळ मधून ना. राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी झाले असून गणपतराव पाटील पराभूत झालेत.