आम्ही अदानी-अंबानी नाही तर जनतेचे सेवेकरी आहोत…….. ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ

वरणानगर(कोल्हापूर) : आम्ही अदानी-अंबानी नसून जनतेचे सेवेकरी आहोत, याची दखल शिवसेनेच्या  नेत्यांनी घ्यावी. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत असताना केवळ शिवसेनेच्या अट्टहासापायी निवडणूक लादल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ  यांनी केला.

दरम्यान आमदार विनय कोरे  यांनी पन्हाळा  तालुक्यातील २४४ पैकी २३२ ठरावधारक मेळाव्याला उपस्थित असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा केला. जिल्हा बँकेच्या छत्रपती शेतकरी विकास आघाडीच्या पन्हाळा तालुक्यातील मतदारांचा मेळावा आज विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक केंद्रात झाला. त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सभापती वैशाली पाटील आदी उपस्थित होते.