सावर्डे उपसरपंच पदी दिपाली पाटील बिनविरोध.

सुळे :सावर्डे तर्फ असंडोली ता.पन्हाळा येथील ग्राम पंचायत उपसरपंचपदी दिपाली कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

उपसरपंच संभाजी कापडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने हे पद सात महिने रिक्त होते.या रिक्त पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच भाग्यश्री बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीत सभा झाली. 

यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने दिपाली पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच यांनी जाहिर केले. नूतन उपसरपंच दिपाली पाटील यांचा सत्कार सरपंच भाग्यश्री बच्चे यांनी केला. स्वागत व आभार ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी केले.यावेळी ग्रा.पं.स.महेश भोसले, मोहन जाधव, शिवाजी सातपुते, सौ.रूपाली परितकर, छाया सुतार, जयश्री पाटील यासह कृष्णात पाटील, विनोद पाटील, दत्तात्रय बच्चे, प्रकाश पाटील, सदाशिव काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.