वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीर मधल्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या इथे ही घटना घडली. कटरा इथल्या वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत.

रात्री 2.45 वाजता ही घटना घडली. सुरुवातीच्या वृत्तानुसार लोकांमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि ते एकमेकाला ढकलू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली असं जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं.

सुरुवातीला मृतांची संख्या 6 असल्याचं सांगण्यात आलं. मात्र नंतर हा आकडा वाढला. मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येईल. जखमींना नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कटरा सार्वजनिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल दत्त यांनी सांगितलं.