LPG सिलिंडर थेट 100 रुपयांनी स्वस्त

मुंबई :  इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी

याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.