गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर–सुहासिनीदेवी घाटगे*

*गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर–सुहासिनीद कागल, प्रतिनिधी :-“गुणवंत विद्यार्थी हे शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर असतात.त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन…

नंदवाळ आषाढी यात्रेसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करा – आमदार राजेश क्षीरसागर*

 कोल्हापूर,  : जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पायी तसेच वाहनाने याठिकाणी येत असतात. अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केडीसीसी बँकेत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना १६ लाखांचे विमा धनादेशांचे वाटप….

कोल्हापूर, अपघाताने मृत आठ शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले. याबाबत…

शक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची ऑनलाईन राज्यव्यापी बैठक

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवारी 26/06/25 रोजी सायंकाळी  राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक…

शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मंत्री हसन…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल

कोल्हापूर  : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत पॉलिटेक्निकच्या  उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चंकित निकाल लागला आहे.  इन्स्टिट्यूट च्या पॉलिटेक्निक विभागाचा …

शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणे करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहात होता. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कारकथा बालकुमारांपर्यंत पोहोचणार आहेत, याचा…

‘गोकुळ’ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात छत्रपती राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १५१ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक…

कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, इटलीतील फॅशन शो मध्ये विनापरवाना कोल्हापूरी चप्पलची नक्कल केल्याबद्दल कारवाई मागणी

कोल्हापूर:कोल्हापूरी चप्पलची परस्पर नक्कल होवू नये आणि स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांवर गदा येवू नये, यासाठी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इटलीतील मिलान शहरातील एका फॅशन शो मध्ये, प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने थेट कोल्हापूरी चप्पलची हुबेहुब डिझाईनची कॉपी केली आहे. वास्तविक २०१९ मध्येच भारत सरकारने कोल्हापूरी चप्पलला जिआय टॅग दिला आहे. त्यामुळे प्राडा कंपनीकडून कोल्हापूर चप्पलची कॉपी करून, स्थानिक कारागिरांवर अन्याय केला जातोय, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. २३ जूनला इटलीमध्ये झालेल्या एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर करण्यात आला. कोल्हापूरच्या चर्मकार कारागिरांसाठी हा एक सुखद धक्का होता. मात्र फॅशन शो आयोजकांनी कोल्हापूरी चप्पलचा असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा प्रदर्शनासाठी कायदेशीर परवानगी घेतली नाही. वास्तविक २०१९ मध्येच कोल्हापूरी चप्पलला  जिओ टॅगींग करून, एकप्रकारे कोल्हापूरी चप्पल बॅ्रँडचे आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन झाले आहे. अशा परिस्थितीत आज कोल्हापुरातील काही चर्मकार कारागिरांना घेवून, युवा नेते कृष्णराज महाडिक  यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरी चप्पल ही कोल्हापूरची आणि महाराष्ट्राची ओळख आहे. या चप्पलला भारत सरकारनं जिआय टॅग दिल्याने, त्याचे उत्पादन ठराविक क्षेत्रात नोंदणीकृत कारागिरांकडूनच होवू शकते. अशा परिस्थितीत प्राडा या कंपनीने इटलीतील फॅशन शो मध्ये कोल्हापूरी चप्पल सारखीच हुबेहुब डिझाईनची चप्पल सादर केली आणि  त्याचा मुळ उगम किंवा कारागिरांचा कसलाही उल्लेख केला नाही. त्यातून स्थानिक कारागिरांच्या हक्कांवर गदा आल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. कृष्णराज महाडिक यांनी या विषयाचे महत्व आणि गांभीर्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडले. अशा पध्दतीने कोल्हापूरी चप्पलच्या कायदेशीर आणि मुलभूत हक्कांवर गदा येत असल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकार मार्फत कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलावीत आणि कोल्हापूरी चर्मकार बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी कृष्णराज महाडिक यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रश्‍नी  कायदेशीर पावले उचलणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेण्यास सांगितले. कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना सोबत घेवून, या महत्वाच्या विषयावर थेट भुमिका मांडली. त्याबद्दल कोल्हापुरातील चर्मकार बांधवांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानले आहेत.    

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व…

🤙 9921334545