D.Y. पाटील मेडिकलच्या MBBS प्रवेशात 50 जागा वाढ, एकूण क्षमता आता 200

कोल्हापूर: येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत नॅशनल मेडिकल कमिशनने 50 जागांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाची एकूण प्रवेश क्षमता 200 झाली आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची अधिक संधी उपलब्ध होणार आहे.

 

 

महाविद्यालयात बुधवारी आयोजित विशेष समारंभात विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

 

डॉ. पाटील म्हणाले, _”वाढीव जागांची मंजुरी ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम अध्यापन व्यवस्था आणि आधुनिक आरोग्यसेवेवर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे.”_

 

यावेळी केक कापून आनंद साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांच्यासह संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

 

विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला श्रीलेखा साटम, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, संजय जाधव, अजित पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

NMC कडून मिळालेल्या या मान्यतेमुळे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाला बळ मिळणार आहे.

 

 

🤙 8080365706