कोल्हापूर:मांगले–सावर्डे बंधाऱ्याची खासदार धैर्यशील माने यांनी पाहणी करून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बंधाऱ्यालगतचा रस्ता वाहून गेल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून बंधाऱ्यालगतच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, उपविभागीय अभियंता बी. आर. पाटील व कोडोली पाटबंधारे शाखेच्या अभियंता नेहा देसाई यांना खा.धैर्यशील माने यांनी दिल्या.
यावेळी शिराळाचे नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, धनटेक पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन सत्यम पाटील, निलेश आवटे, सुभाष पाटील, उत्तम गावडे, बाबा पाटील, पैलवान मनोज पाटील, सुमित पाटील, संदीप चरापले, रवींद्र कोकाटे, दत्तात्रय तडाखे, नितीन दिवे, विनायक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
