कोल्हापूर अर्थ वॉरिसर्य रोटरी क्लब ऑफ गार्गीज, सकाळ माध्यम समूह यांच्याकडून 11 यलो डस्टबीन सुपूर्द

कोल्हापूर  : कोल्हापूर अर्थ वॉरिसर्य रोटरी क्लब ऑफ गार्गीज, सकाळ माध्यम समूह व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने घरगुती जैव वैद्यकिय कचरा संकलनासाठी 11 यलो डस्टबीन आज विविध हॉस्टेलल्स ना सुपुर्द करण्यात आले.

 

 

सध्या कचरा संकलनाबाबत शासनाकडून आलेल्या निर्देशाप्रमाणे कचऱ्याचे वर्गीकरण करुन संकलीत करणे व त्यावर प्रक्रिया करणे याबाबतचा पहिला टप्पा महापालिकेच्यावतीने यलो डस्टबीन उपक्रमामार्फत राबविण्यास सुरवात झाली. कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे अभिजीत कुलकर्णी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. विविध हॉस्टेलसाठी हा पहिला टप्पा राबविला जात आहे. या डस्टबीनमध्ये पिवळी पिवशीही देण्यात येत असून ती पिशवी संबंधीत टिप्पर चालकांकडे देण्यात येणार आहे. तेथून ती महापालिकेच्या जैव वैद्यकिय कचरा प्रकल्पावर प्रक्रियेसाठी देण्यात येणार आहे.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, नगरसेवक सचिन शेंडे, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांनी या कचरा वर्गीकरणातील सहकार्य केलेबद्दल कोल्हापूर अर्थ वॉरियर्स रोटरी क्लब ऑफ गार्गीज व सकाळ माध्यम समूहाचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, सकाळचे मुख्य बातमीदार निवास चौगले, अर्थ वॉरियर्सचे सुहास बट्टेवार, परितोष उरकुळे, नितीन कुलकर्णी, आशिष कोंगनेकर, प्रिया मोहिते, संगीता कोकीतकर, रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या अध्यक्षा अंजिली मोहिते, दिपीका कुंभोजकर, योगीनी कुलकर्णी, रेणूका सप्रे, मेघना कुलकर्णी, गिरीजा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

🤙 8080365706