कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि. 01 एप्रिल ते 30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास महापालिका करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आलेली आहे.

त्यानुसार दि.8 जून 2026 रोजी एकूण 2,013 मिळकतधारकांनी 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेवून 1 कोटी 18 लाख 7 हजार 79 रुपये इतकी रक्कम जमा करुन सवलत योजनेचा लाभ घेतलेला आहे.
तसेच, दि.1 एप्रिल ते दि. 08 जून 2026 या कालावधीत 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्या मिळकत धारकांची संख्या 36,037 एवढी असून त्यामधून रु. 16 कोटी 18 लाख इतकी रक्कम महानगरपालिकेकडे जमा झालेली आहे. अजूनही 1,34,963 एवढ्या मिळकतधारकांनी चालू आर्थिक वर्षामधील घरफाळा भरणा केलेला नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्या मिळकतधारकांनी अद्यापही घरफाळा भरणा केला नसेल त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9:00 ते दुपारी 4:30 या कालावधीमध्ये आपला घरफाळा भरावा. तसेच, नागरीकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करणेची सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्र मधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करणेची सुविधा देखिल उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.
तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी दि.30 जून 2026 अखेर आपली सन 2026-27 चालू आर्थिक वर्षाची घरफाळ्याची रक्कम भरुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
