कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज सायंकाळी 5 वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांची पाहणी करून कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली.

यावेळी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, विभागनिहाय कामकाजाची कार्यपद्धती तसेच उपलब्ध सुविधांची माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडून घेतली.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त कार्यालय, उपआयुक्त कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, रुग्ण व कल्याण विभाग, आस्थापना विभाग, मुख्य लेखापरीक्षक कार्यालय, रेकॉर्ड विभाग, डेटा सेंटर, नगरसचिव विभाग, पीडब्ल्यूडी अकाउंट विभाग, शहर अभियंता कार्यालय, प्रकल्प विभाग, लेखा विभाग, नगदी विभाग, नागरी सुविधा केंद्र, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग तसेच जन्म-मृत्यू नोंदणी विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी विविध विभागांतील कामकाजाची माहिती घेत असताना नागरिकांना अधिक गतिमान व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच महापालिकेची विद्
