तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा कधी? करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापालिका आयुक्तांना सवाल?

कोल्हापूर :गांधीनगर परिसरात शिवसेनेच्या वतीने बेकायदेशीर बांधकामाच्याबाबतीत सन २०१२ पासून वेळोवेळी आवाज उठवून गांधीनगर बंदसारखी मोठी आंदोलने करण्यात आली. शासनाला जाग आणण्यासाठी शासनस्तरावर निवेदने ही देण्यात आली. तसेच न्यायालयीन लढाई लढून बेकायदेशीर बांधकामधारकांवर शासनाच्या तरतुदीनुसार कारवाई व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.

 

उचगांव व महानगरपालिका ह‌द्दीचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालय यांनी महानगरपालिकेच्या बाजुने दिला असल्याने त्या आदेशांनुसार बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणे बंधनकारक असून, बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाच्या तरतुदीनुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बेकायदेशीर बांधकामधारकांना चपराक असून, शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून तसेच यासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान राखून बेकायदेशीर बांधकामे व शासकीय जागेवरील अतिक्रमणे करणाऱ्या मिळकतधारकांवर शासनाच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.*

या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. राजेंद्र भारूड, आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना देण्यात आले..

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मान राखत पारदर्शकपणे सर्व अतिक्रमणे पाडली पाहिजेत..

करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, अतिक्रमण झालेल्या बांधकामांना कोणत्याही प्रकारचा अभय देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन या विषयी दाद मागू..*

यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख मंजित माने, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासो नलवडे, योगेश लोहार, कैलास जाधव, दीपक अंकल, दीपक धिंग, रामराव पाटील, अजित चव्हाण, बाबुराव पाटील आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते..

🤙 8080365706