पन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

कोल्हापूर: पन्हाळा येथील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा (सादोबा दर्गा) समोरील तलावा शेजारी असलेले बांधकाम हे अनधिकृत अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाले आहे. सादोबा दर्गा ट्रस्टींनी येत्या दोन दिवसात अतिक्रमण काढून न घेतल्यास 9 मे रोजी प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण केलेले बांधकाम निष्कासीत करण्याचे ठरले आहे. अतिक्रमण निष्कासन कारवाई दरम्यान मुस्लीम धर्मीयांकडून एकत्र येवून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अतिक्रमण कारवाई बाबत माहिती घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर पक्ष संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे पन्हाळगड येथे येवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

 

 

 

 

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत पन्हाळगड व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार 8 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 10 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नागरिकांनी एकत्र येऊ नये तसेच रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करू नयेत, असे निर्देश दिले आहेत.

 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

🤙 8080365706