मुंबई:पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर सर्व समावेश व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. विधान परिषदेमध्ये सदस्य श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे
सरकारचे लक्ष वेधले.

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, कोरोनानंतर वृत्तपत्र क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी, त्यातून निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न,
बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने असलेल्या त्यांचे योजनेचे प्रस्ताव रखडणे, पत्रकारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महामंडळातर्फ मदतीची आवश्यकता, गृहनिर्माण योजनेअंतर्गत पत्रकारांना घरे देणे, अशा विविध विषयांकडे लक्ष वेधले.
याबाबत बोलताना मंत्री शेलार म्हणाले की, पत्रकार आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्वापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्य
