कागलमध्ये चिरमुरे–फरसाण भट्टीला अचानक आग ; मंत्री मुश्रीफ यांनी शासन स्तरावर मदत करण्याचे दिले आश्वासन 

कोल्हापूर:कागल शहरातील ब्रह्मपुरी गल्ली येथे नंदकुमार बोभाटे व प्रकाश बोभाटे यांच्या चिरमुरे–फरसाण भट्टीला अचानक आग लागून त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन काही क्षणात जळून खाक झाले. या भीषण आगीत भट्टीसह साहित्य, कच्चा माल व तयार फरसाण पूर्णपणे नष्ट झाल्याने बोभाटे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ही दुःखद घटना समजताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी ब्रह्मपुरी गल्ली येथे भेट देऊन बोभाटे कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन करत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.

“अचानक आलेल्या संकटात शासन आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन देत आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

यावेळी माजी नगरसेविका माधवी मोरबाळे, सुरेश बोभाटे, सनी जकाते व इतर उपस्थित होते.

🤙 8080365706