अशोकराव माने पॉलीटेक्निक गुणवत्तेत आघाडीवर : विजयसिंह माने

अंबप:- नावीन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांना सर्वोच्च यश मिळवून देते.याचसाठी अशोकराव माने पॉलिटेक्निकने नेहमीच दर्जेदार शिक्षणपद्धतीचा अवलंब करीत गुणवत्ता सिद्ध केली आहे.तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षेत विद्यार्थी अव्वल येण्याची परंपरा पॉलिटेक्निक ने कायम ठेवली आहे.हिवाळी परीक्षेतही निकाल उत्कृष्ट लागला आहे अशी माहिती संस्था अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी दिली.

वाठार येथील अशोकराव माने पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यानी राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षेत चांगल्या गुणांसह यश मिळविले त्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य डॉ.युवराज गुरव प्रमुख उपस्थित होते.
शैक्षणिक वातावरण ऊर्जादायी आहे.त्यामुळे विद्यार्थी उस्फूर्तपणे नावीन्यपूर्ण संकल्पना राबवितात.संशोधनावर आधारित प्रयोग करून आपले कौशल्य सिद्ध करीत आहेत.त्यामुळे पॉलिटेक्निकचा निकाल सर्वोत्कृष्ट लागला आहे.८२ विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण ,६३७ विद्यार्थी विशेष प्राविण्य,५२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अशी माहिती माहिती डॉ.युवराज गुरव यांनी दिली.
अनुक्रमे निकाल असा – अर्पिता दिलीप पाटील ९८.१२%:चेतन जाकू ढाले (९७.८८%, हर्षदा आनंदा पाटील ९६%, सानिया तानाजी हंकारे ९५.७७ %, संचित सिताराम तांदळे ९५.४१ %, श्रावणी अरुण पोवाळकर ९५.४१ %, आदित्य नंदकुमार पाटील ९४.१२ %, विजय बालाजी भोसले ९३.६५ %, सिद्धी राजेंद्र वांडकर ९३.६५%, रिया संजय साळुंखे ९३.५३ %.
यावेळी प्रा. प्रदीप हसबे, डॉ. सुहास लकडे, प्रा. भरत घाटगे, प्रा. निखिल पाटील, प्रा. सुनील माने, प्रा. सुहास फारणे उपस्थित होते.

🤙 8080365706