कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामंकित कंपन्याकडून १२५ हून अधिक जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत.

अमेझॉन, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी), इन्फोसिस, जॉन्सन कंट्रोल्स, टेक्निमाँट यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह फोर्स मोटर्स, भारत फोर्ज, शेफलर इंडिया, लुकास टीव्हीएस, डायना टीएम फोर, फोर्व्हिया, बेलराईज इंडस्ट्रीज, सागर डिफेन्स, एम. जे. बायोफार्म आदी कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
यावर्षी विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या ऑफर्सची संख्या १२५ पेक्षा अधिक असून जॉन्सन कंट्रोल्स कंपनीने ६.५६ लाख रुपये वार्षिक वेतनाचे सर्वोच्च पॅकेज दिले आहे. विभागातील विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स तसेच मुलाखत पूर्वतयारीचे मार्गदर्शन नियमितपणे दिले जात असल्यामुळे प्लेसमेंटमध्ये सातत्याने मोठे यश मिळत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.
यावर्षी सागर डिफेन्स, पुणे येथे सर्वाधिक २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर फोर्स मोटर्समध्ये १२, शेफलर इंडियामध्ये ७, लुकास टीव्हीएसमध्ये ७, बेलराईज इंडस्ट्रीजमध्ये ७, भारत फोर्जमध्ये ४, टेक्निमाँटमध्ये ३ तसेच अमेझॉन, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी), जॉन्सन कंट्रोल्स आणि इन्फोसिस यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्येही विविध विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.
या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईगडे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ सुनील रायकर यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
