कोल्हापूर:
पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी व भुदरगड तालुक्यांत वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू व गंभीर दुखापत तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजना व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी असे निवेदन आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) धैर्यशील पाटील यांना दिले.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा वनपरिक्षेत्रातील जंगली प्राण्यांच्या सर्वेक्षणासाठी 8.50 लाखांच्या निधीतून वनविभागाला ड्रोन देण्यात आला. यावेळी बाधित परिसरातील अनेक शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
