राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णसेवा प्रकल्पांचा आरोग्य मंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईमुंबई विधानसभेतील प्रश्नाच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार डॉ. कयंदे  यांच्या उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य अभियंता लेफ्टनंट कर्नल  शिवशंकर मंडल, रिजनल डायरेक्टर अभिलाषा झा, राज्य कामगार विमा योजना प्रशासनाचे संचालक वायाळ तसेच केंद्र व राज्य शासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून योग्य त्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या,
-अंधेरी (पूर्व) औद्योगिक वसाहतीतील कामगार रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित अडचणी सोडवण्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय.
-कोल्हापूर येथील राज्य कामगार विमा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश, जेणेकरून स्थानिक कामगारांना त्वरित आरोग्य सुविधा मिळू शकतील.
-उल्हासनगर येथील शंभर खाटांचे रुग्णालय एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आदेश.
-ग्रंथालय कामगार, रेशन दुकानदार यांसारख्या असंघटित कामगार वर्गालाही राज्य कामगार विमा योजनेचे लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय.
-राज्यातील कामगार विमा योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यात येईल.
-येत्या १५ दिवसांत अंधेरी येथे स्थानिक आमदार, उद्योग विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ रुग्णालय स्थळी भेट देऊन अंमलबजावणीबाबत पुढील निर्णय घेईल.
-कामगारांचे आरोग्य आणि कल्याण ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. यासाठी रुग्णसेवा योजनांचे प्रभावी अंमलबजावणीकडे शासन कटिबद्ध आहे.

🤙 9921334545