मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरिता कौशिक लिखित ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नागपूरमधील क्रॉसवर्ड येथे प्रकाशन करण्यात आले. नागपूर मेट्रोमुळे नागरी जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची, वेगवेगळ्या घटकांवर झालेल्या बदलांची आणि नागपूर शहराच्या इतिहासाची प्रभावी मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, पुस्तकातील काही ओळी वाचताना नागपूर मेट्रोच्या अतुलनीय विकासाची आणि पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या प्रगतीची झलक अनुभवता आली. या अनुभवाने नागपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा दिली.

नागपूर मेट्रो प्रकल्प देशातील सर्वांत जलद पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांपैकी एक आहे. यामुळे नागपूरच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाला असून नागपूरकरांच्या जीवनशैलीत सकारात्मक सुधारणा झाली आहे. ही प्रगती देशातील नवीन कार्यसंस्कृतीचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रकाशन प्रसंगी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.

🤙 9921334545