कुंभोज ( विनोद शिंगे)
जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी आणि प्रहार अपंग क्रांति संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा अध्यक्ष (उत्तर विभाग) प्रहार संघटना सुनील पाटील ,इचलकरंजी महिला अध्यक्षा अंजना नेतले सदस्य प्रहार संघटना ईश्वर फडतरे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विकास वीरकर (दिव्यांग विभाग अधिकारी मनपा इचलकरंजीडॉ. सौ.सुरेखा नीटवे व सौ नीलम येसाटे यांची उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूडॉ. पी. जे.बडबडे अध्यक्ष जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ तसेच दिशा प्रशालेच्या प्रमुख डॉ. सौ.जे.पी.बडबडे उपस्थित होत्या.
पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्रमुख मुख्याध्यापक एस. एम. लोंढे यांनी केले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. पाहुण्यांची ओळख कुसुम कांबळे यांनी केली. यावेळी पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. पी.जे.बडबडे यांच्या हस्ते करण्यात आले. सुनील पाटील यांनी दिव्यांग दिनाविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. तसेच विकास विरकर यांनी महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व शेवटी संस्थेस सर्वपरी सहकारी करण्याचे आश्वासन दिले.
डॉ.जे. पी. बडबडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या व प्रशालेच्या विविध शैक्षणिक उपक्रमाचा आढावा दिला. सदर कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार रवींद्र पाटील खजिनदार संजय कोले , संस्थेचे सेक्रेटरी तसेच दिशा प्रशालेचे उपाध्यक्ष अशोक मगदूम , व सेक्रेटरी अजित बलवान यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता कोळीयांनी केले तर शेवटी आभार कांबळे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जागतिक अपंग दिनानिमित्त आज प्रशालेमध्ये मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या.यावेळी सर्व शिक्षक व सहकारी उपस्थित होते.