राहुल आवाडेंनी घेतली संभाजी भिडेंची भेट

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीच्या विजयानंतर सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी भेट घेवून आशीर्वाद घेतला.

 

याप्रसंगी डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय संभाजी भिडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी संवादाद्वारे गुरुजींच्या विचारशक्तीला प्रोत्साहन दिले आणि समाजातील सर्व स्तरांवर सकारात्मक बदल घडवून आणण्याचे वचन दिले. त्यांच्या या भेटीने नवा उत्साह आणि प्रेरणा मिळवली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706