कोल्हापूर : करवीर मतदारसंघातून विजय उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी दिसत आहे. गेली दोन दिवस शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. अनेक मान्यवर, मतदार संघातील लोक भेटीसाठी येत आहेत.
यावेळी, नरके यांनी लोकांकडून मिळणाऱ्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. करवीर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने राज्यात सर्वाधिक मतदान करून माझा विजय खेचून आणला. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव सोबत राहोत, हीच ईच्छा. मी नेहमीपेक्षा अजून जोमाने आणि ताकदीने करवीर विधानसभा मतदारसंघाच्या, त्याचबरोबरीने कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सदैव तत्पर राहीन. अशा भावना व्यक्त केल्या.