कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी मलाच मंत्रिपद मिळणार असा विश्वास कार्यर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.
क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात शिंदेसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि 1 पाठिंबा असलेले आमदार आहेत.ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद फॉर्मुला आहे. मी ही तिसऱ्या टर्मचा आमदार आहे.. गेली पा वर्ष नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या मंत्री पदाच्या दर्जाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळला आहे. M मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून शाश्वत परिषदेसारख्या संकल्पनांद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत असा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला आहे.