कोल्हापूर : विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीच्या विजयानंतर आमदार राहुल आवाडे यांचा इचलकरंजी भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारांच्या उपस्थितीत सत्कार करून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे 56, 811 मतांनी विजयी झाले. इचलकरंजी भाजपचे राहुल आवाडे व महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये आवाडे विजयी झाले.