कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बहुप्रतिक्षित अशा रिंग रोडच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमल महाडिक म्हणाले, गेली अनेक वर्षे खड्डे आणि धुळीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती.
रखडलेल्या या कामाचा शुभारंभ करताना मनस्वी आनंद होत आहे. 3 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर पद्धतीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सत्यजित कदम यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.