गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची आज पुन्हा बैठक; सहा तालुक्यांत जागावाटपाचा तिढा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीचे प्रमुख नेते आणि माजी संचालकांची आज रविवारी (दि. 27) पुन्हा बैठक होत आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये दुपारी 4 वाजता या बैठकीला सुरुवात होईल.

 

गोकुळची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. आम्ही सर्व जुळे भाऊ आहोत, असे सांगत महायुतीमधील मतभेद मिटल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, अंतर्गत पक्षीय पातळीवर अद्यापही ठराव संख्येवरून मतभेद कायम आहेत.

 

राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य पक्षाकडे असलेल्या तालुकानिहाय ठराव संख्येवर आक्षेप घेतले जात आहेत. यामुळे आजच्या बैठकीत सहा तालुक्यांतील तिढा सोडवण्यासाठी ठराव संख्येवर चर्चा होणार आहे.

 

विशेषतः हातकणंगले तालुक्यात 160 ठराव असून, भाजपकडे 38 ठराव असल्याचे घटक पक्षांचे मत आहे. त्यामुळे आज भाजपकडून ठरावधारकांचे आधार कार्ड दाखवत प्रत्यक्ष ठरावांची ताकद सिद्ध केली जाणार आहे. हातकणंगलेच्या धर्तीवर करवीर, पन्हाळा, भुदरगड, गडहिंग्लज आणि आजरा या तालुक्यांमध्येही घटक पक्षांना प्रत्यक्ष ठराव संख्या सिद्ध करावी लागणार आहे.

🤙 8080365706