श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ ,५ लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट ; महादेवराव महाडिक

कसबा बावडा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम शुभारंभ मुहूर्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शुभहस्ते शनिवार( दि.१६) रोजी सकाळी करणेत आला.

 

 

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी या हंगामात ५.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे व किमान १२.२५ टक्के साखर उताऱ्याचे उद्दिष्ट ठेवले असून सर्व सभासद व तोडणी वाहतुक यंत्रणा आणि कामगारांच्या सहकार्याने ते यशस्वीपणे पूर्ण करू आणि या हंगामातील नोंद असलेला संपूर्ण ऊस मुदतीत गळीत केला जाईल असे सांगितले. कारखान्याकडे पुरेशी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा उपलब्ध असून या वर्षी नवीन ऊस तोडणी मशिन खरेदीसाठी देखील सहकार्य करणेत आले असून नवीन मशिनरींचे कारखाना स्थळावर कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंदा चौगले, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस व मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण यांचे हस्ते पुजन करणेत आले. या हंगामासाठी सभासद, विगर सभासदांनी आपला नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास पाठवून गळीत हंगाम यशस्वी करणेस सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणेचे दृष्टीने काम सुरू केले आहे असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंदा चौगले व सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, कार्यलक्षी संचालकनामदेव पाटील, तसेच कारखान्याचे माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद, पद्मभूषण वसंतदादा ऊस तोडणी वाहतूक संस्था व श्री छ. राजाराम नागरी सहकारी पतसंस्था तसेच श्री राजाराम कारखाना नोकर सह. सोसायटीचे पदाधिकारी व अधिकारी, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, निमंत्रित मान्यवर, ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार व हितचिंतक उपस्थित होते.

🤙 8080365706