सभांमधला लहानांपासून थोरांपर्यंतचा उत्साह, विजयाचा विश्वास देऊन जातो : चंद्रदीप नरके

कोल्हापूर: करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा कोपार्डे, कुडित्रे, वाकरे या ठिकाणी संपर्क दौरा झाला. यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले, लोकांची गर्दी आणि गर्दीचा उत्साह दहा हत्तींचे बळ देणारं आहे , माझ्या माता-भगिनी देखील ओवाळणीचे ताट घेऊन उभ्या असतात, त्यांची ही श्रद्धा माझ्यासाठी आशिर्वाद आहे. तरुणांची गर्दी, अबालवृद्धांचा उत्साह सगळं काही अंगावर शहारे आणणारे आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो ही फक्त गर्दी नाही तर विजयाची नांदी आहे. माझ्यावरील लोकांच्या विश्वासाबद्दल मी समाधानी आहे.

 

 

यावेळी महायुतीचे पदाधिकारी, विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706