जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम   

कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या सामान्य प्रशासन विभाग व ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे माहिती अधिकार अधिनियमाबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

 

या कार्यक्रमामध्ये *श्री. विक्रमसिंह चौगुले, प्रविण प्रशिक्षक* यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 तसेच त्यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय व तरतुदींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर विहित मुदतीत कार्यवाही करणे, अभिलेखांचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच अधिनियमातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे याबाबत श्री. चौगुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमास **श्री. ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद कोल्हापूर, श्री. अविनाश मेश्राम, सहाय्यक गट विकास अधिकारी (ग्रामपंचायत)** यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व कक्ष अधिकारी, अधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

 

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने आयोजित या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियमातील विविध तरतुदी तसेच सुधारित शासन निर्णयांची माहिती मिळून दैनंदिन प्रशासकीय कामकाजात त्यांचा प्रभावी वापर करण्याबाबत मार्गदर्शन मिळाले.

 

 

🤙 8080365706